फर्जंद : मराठा योद्धा ... या चित्रपटातुन घेण्यासारखे धडे।।
फर्जंद : मराठा योद्धा ... या चित्रपटातुन घेण्यासारखे धडे।।
सिने कलाकृती चा उत्तम नमुना
म्हणून हा सिनेमा पहिल्याचा खुप आनंद झाला, पण त्याहून श्रेष्ठ होता त्या सिनेमाचा विषय,
शिवाजी महाराज्यांच्या स्वराज्यातील निष्ठावान मावळे कसे होते ह्याचे हे चित्रण, ""कोंडाजी फर्जंद"" ह्या शूर पराक्रमी सरदाराने फक्त ६० मावळ्यांसह सर केलेला किल्ला ""पन्हाळा"" चा इतिहास दाखवलेल्या ह्या सिनेमाचा प्रत्येक क्षण अंगावर काटे आणणारा असतो, विशेष म्हणजे समोर अडीच हजार राक्षसांची फौंज लढाईला उभी असतांना फक्त साठ मावळ्यांनी त्यांचा सामना कसा केला असणार अश्या ह्या प्रचंड पराक्रमी शूर इतिहासावर बनवलेल्या ह्या सिनेमाचे हे वैशिष्ठ,
१. नेते: "कोंडाजी फर्जंद" एक मजबूत नेता होते. ते संघावर (Team) विश्वास ठेवत, ते प्रत्येक सदस्याला सांगत, त्यांनी कसे करावे, त्यांना समजून सांगत आणि त्यांना करून दाखवत. आणि सगळ्यांना सांगत, सर्वोत्तम प्रयत्न करा आणि वेळ कमी करण्याचा प्रयत्न करा .
२. संघ (Team): त्यांचा संघात (टीमवर) विश्वास होता. कुठलेही कार्य करताना ते कोणालाही थांबवत नसत, फक्त आवशक्यता भासल्यास दुरुस्ती करत होते, नेहमी टीमला प्रेरित करत.
सर्व टीम "पन्हाला" या दिशेने काम करत होते.
३. धोरणः त्याच्याकडे मजबूत धोरण होते. फक्त 60 व्यक्ति ना घेऊन कार्य कशे पूर्ण करायचे .त्याच्या धोरणा नुसार ते पन्हाळा वर चालून गेले. आणि काही विरोधकांविषयी माहिती गोळा केली.
४. अंमलबजावणी: प्रत्येकजण आपल्या शब्दाच्या दिशेने बांधला जातो, कोणीही धोरण आणि नियोजनानुसार कार्य करत होते, कारण कोणीही अपयशी होता काम नये. प्रत्येकजण कार्य प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी आपल्या सर्वोत्तम प्रयत्न करत होते.
,५. चित्रपट खुपकाही शिकवून जातो. विद्यार्थीसाठी, उद्योगधंद्या साठी, व्यावसायिकां साठी, आणि ज्यांनी काही धैय ठरवले आहे त्या सर्वांसाठी हा चित्रपट खुप काही शिकवून जातो.
जर तुम्हाला लेख आवडला असेल तर जरून मला कळवा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
-संदीप दोड, मुंबई
मेल : sandipk.002@gmail.com
फेसबुक: https://www.facebook.com/sandipk.002
अस्वीकार: या लेखातील सर्व मते वैयक्तिक आहेत आणि कोणत्याही व्यक्तीचे प्रतिनिधीत्व करत नाहीत.
हा लेख कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी नाही आणि जर काही चूक झाली असेल तर क्षमा करावी.
Leave a Comment